अभिनेत्री रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेने निरोप घेतला असला तरी रसिका सुनीलने प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. रसिका सोशल मीडियावर सक्रिय असून ती त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिच्या खाजगी आणि प्रोफेशनल लाइफबद्दल अपडेट देत असते. ती सध्या लॉस अँजेलिसमध्ये आहे आणि ती पायलट झाली आहे.
या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला मेकओव्हर, या फोटोत ओळखणेही होतंय कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 12:26 IST
या अभिनेत्रीचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला मेकओव्हर, या फोटोत ओळखणेही होतंय कठीण
ठळक मुद्देरसिकाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. रसिकाने केस कापले असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.