Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम जेनी उर्फ शर्मिलाचा सोशल मीडियावर हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 06:30 IST

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि ही मालिका टीआरपीमध्येदेखील अव्वल स्थानावर आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि ही मालिका टीआरपीमध्येदेखील अव्वल स्थानावर आहे.

 

या मालिकेत जेनीची भूमिका साकारून अभिनेत्री शर्मिला राजाराम घराघरात पोहचली. या मालिकेतील साधी व प्रामाणिक जेनीने रसिकांच्या मनात घर केले आहे. शर्मिला सोशल मीडियावरील हॉट फोटोजमुळे चर्चेत आली आहे. 

सध्या या मालिकेत जेनी राधिकासाठी काम करते आहे. सुरूवातीला ती गुरूनाथच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असते. या मालिकेत शर्मिला जरी सोज्वळ दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूप ग्लॅमरस आहे.

नुकतेच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये ती हॉट व ग्लॅमरस दिसते आहे. 

सोशल मीडियावर शर्मिलाच्या या फोटोंची खूप चर्चा होत आहे.

शर्मिलाने या मालिकेत काम करण्यापूर्वी पुढचं पाऊल या मालिकेत रूपाली म्हणून खलनायिकेची भूमिका साकारली होती.

या मालिकेतून ती लोकप्रिय झाली होती.

याशिवाय हिंदी मालिका मेरे साईमध्ये देखील शर्मिला काम करते आहे. 

टॅग्स :शर्मिला राजाराममाझ्या नवऱ्याची बायकोमेरे साई मालिका