Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही अभिनेत्री साकारतेय झी मराठीवरील मालिकेत मुख्य भूमिका, ओळखा पाहू कोण आहे ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 17:31 IST

या फोटोत ही अभिनेत्री खूपच छान दिसत असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे.

ठळक मुद्देअनिता या फोटोत खूपच छान दिसत असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. तिच्या या फोटोला अनेक लाईक मिळाले असून तिचे फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत राधिकाच्या भूमिकेत आपल्याला अनिता दातेला पाहायला मिळत आहे. या मालिकेमुळे तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. अनिता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर नुकताच तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनिताचा लूक खूपच वेगळा दिसत असून या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण जात आहे.

अनिता या फोटोत खूपच छान दिसत असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. तिच्या या फोटोला अनेक लाईक मिळाले असून तिचे फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. तू छान दिसत असून तुझी स्माईल देखील खूपच छान आहे असे तिचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील राधिका म्हणजेच अनिता दातेने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे तिच्या करियरला एक वळण मिळाले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

अनिता ही मुळची नाशिकची असून तिचे बालपण, शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. नाशिकच्या कन्या विद्यालयात तिचे शिक्षण झालेले आहे. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली. पुण्याच्या ललित कला केंद्रातून तिने पदवी घेतली आहे. अनिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. 

टॅग्स :अनिता दातेमाझ्या नवऱ्याची बायको