Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मैनें प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीला 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यानं घातली भुरळ, लेकीसोबत लगावले ठुमके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:51 IST

'मैनें प्यार किया' सिनेमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree)ने 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर बनवलेली रिल चाहत्यांना खूप भावते आहे.

'मैनें प्यार किया' सिनेमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री (Bollywood Actress Bhagyashree) सध्या सिनेइंडस्ट्रीत फारशी सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरुन ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिला सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेलं गाणं 'एक नंबर, तुझी कंबर'ने भुरळ घातली आहे. तिने चक्क लेकीसोबत या गाण्यावर डान्स केला आहे आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

संजू राठोडचे नवीन गाणं 'एक नंबर, तुझी कंबर' सध्या सगळीकडे धुमाकूळ घालताना दिसत आहे. सोशल मीडियावर तर या गाण्यावरील रिल पाहायला मिळत आहेत. या गाण्याची भुरळ फक्त सामान्य लोकांनाच नाही तर सेलिब्रेटींनाही घातली आहे. नुकतेच या गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने रिल बनवला आहे. यावेळी तिला तिची लेक अवंतिका हिनेदेखील साथ दिली आहे. या व्हिडीओत भाग्यश्रीने हिरव्या रंगाची ऑरगेंजा साडी नेसलीय तर लेक अवंतिका दासानीने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे. या गाण्यावर त्या दोघींनीही खूप छान डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर संजू राठोडने सुंदर अशी कमेंट केली आहे.

'मैने प्यार किया' या चित्रपटातून झळकलेल्या भाग्यश्रीने सर्वांचीच मने जिंकली. या चित्रपटानंतर सलमानचे करिअर उंचावले मात्र भाग्यश्रीने बालपणीचा मित्र आणि बिझनेसमन हिमालय दासानीसोबत १९९० मध्ये लग्न केलं. त्यानंतर तिनं अभिनयापासून दूर राहणं पसंत केलं. या दोघांना अवंतिका आणि अभिमन्यू ही दोन मुले आहेत. ते दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.

टॅग्स :भाग्यश्री