Join us

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या नवऱ्यावर साडेचार तासांची सर्जरी, व्हिडीओ शेअर करत दिली हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 14:11 IST

Maine Pyaar Kiya Fame Bhagyashree : 'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीचा पती रुग्णालयात दाखल असून तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून माहिती दिली आहे.

'मैंने प्यार किया' (Maine Pyaar Kiya) फेम बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगत असते. भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीने दोन पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यात तिने सांगितले की तिचा पती हिमालय दासानी यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि आता तो पूर्णपणे बरा आहे. भाग्यश्रीने तिच्या पोस्टमध्ये ती आपल्या पतीची कशी काळजी घेते हे देखील दाखवले आहे.

भाग्यश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा नवरा हॉस्पिटलच्या बेडवर बसून त्याचा फोन वापरत असल्याचे दिसून येते. यानंतर, हिमालय दासानीला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन रूममध्ये नेले जाते. तो क्षण थेट दाखवला आहे. ऑपरेशन थिएटरची अवस्थाही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे.

या व्हिडिओशिवाय भाग्यश्रीने काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती तिच्या पतीसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर गोड हसू आहे आणि दोघेही खूप आनंदी आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'त्याच्या उजव्या खांद्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली, ज्याला सुमारे साडेचार तास लागले आहेत. फ्रॅक्चर बरे होत आहेत. योग्य वेळी योग्य डॉक्टरांकडे जाणे महत्त्वाचे आहे. आम्हाला सांगण्यात आले की तो एका दिवसात बरा होईल आणि आम्हाला विश्वास बसला नाही की ते शक्य आहे, परंतु ते घडले. डॉ. गौतम आणि त्यांच्या टीमने घेतलेल्या वैद्यकीय सुविधा आणि काळजीबद्दल धन्यवाद. पतीची शस्त्रक्रिया चांगली झाली.

टॅग्स :भाग्यश्री