Join us  

VIDEO : अरियानावर सगळेच फिदा...! महिमा चौधरीची लेक इव्हेंटमध्ये आली अन् भाव खाऊन गेली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:57 PM

Mahima Chaudhary With Daughter: महिमा सोशल मीडियावर मात्र प्रचंड अक्टिव्ह आहे. अर्थात सध्या महिमाची नाही तर तिच्या लेकीची चर्चा होतेय.

Mahima Chaudhary With Daughter: 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary) क्वचित एखाद्या सिनेमात दिसते. पण हीच महिमा सोशल मीडियावर मात्र प्रचंड अक्टिव्ह आहे. अर्थात सध्या महिमाची नाही तर तिच्या लेकीची चर्चा होतेय. होय, महिमाच्या लेकीच्या   सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ पाडली आहे. तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडीओ आहे ‘उंचाई’ या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंग इव्हेंटचा.या इव्हेंटला महिला तिची लेक अरियानासोबत पोहोचली. तिला पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. याआधीही अरियानाचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण या व्हिडिओतील महिमाच्या लेकीचं सौंदर्य पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. अनेकांजण अरियाना फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू कधी करेल, याची प्रतीक्षा करत आहेत.

महिमा चौधरीने 2006 साली मुंबईतील आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं. लग्नाच्या काही महिन्यांतच तिने मुलीला जन्म दिला. महिमा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती, अशी चर्चा यानंतर रंगली होती. पण आता महिमा बॉबीपासून विभक्त झाली आहे. 2013 मध्ये बॉबी आणि महिमा विभक्त झाले. आता महिमा सिंगल मदर म्हणून मुलांचा संभाळ करते. मुलीची कस्टडी मिळवण्यासाठी महिमाने बरीच मोठी कायदेशीर लढाई लढली. 

महिमाचं खरं नाव ऋतू चौधरी आहे. महिमाने आपले मॉडेलिंग करिअर ऋतू चौधरी नावानेच सुरु केलं होतं. पण सुभाष घई यांनी ‘परदेस’ सिनेमात तिला कास्ट केलं आणि त्यांनीच तिचं महिमा असं नामकरणही केले. ‘परदेस’ सिनेमापूर्वी एका जाहिरातीत महिमा झळकली होती. या जाहिरातीत महिमाला पाहून सुभाष घई यांनी आपल्या चित्रपटात संधी दिली होती. बॉलिवूडच्याच नव्हे तर महिमाच्या पर्सनल लाईफमध्येही अनेक चढउतार आले. फ्लॉप करिअर, लग्नापूवीर्ची प्रेग्नेंसी, लिएंडर पेससोबतचे अफेअर अशा एक ना अनेक गोष्टींमुळे महिमा चर्चेत राहिली.

टॅग्स :महिमा चौधरीबॉलिवूडसेलिब्रिटी