आभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री माही गिल आता निर्माता बनली आहे. तिने एका शॉर्ट फिल्मवर पैसा लावला असून या शॉर्ट फिल्मचे नाव आहे ‘मवाद.’ २० मिनिटांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित सुभाषचंदर यांनी केले आहे. माहीच्या मते, अमितने तिला जेव्हा या शॉर्ट फिल्मची स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा ती लगेचच या चित्रपटाची निर्माती बनायला तयार झाली. माहीने सांगितले की, भविष्यात ती चित्रपट बनवणार आहेच, शिवाय अभिनयही सुरू ठेवणार आहे.
माही गिल बनली निर्माता
By admin | Updated: October 15, 2014 00:01 IST