Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mahesh Babu Daughter: आजी सोडून गेली, महेश बाबूची लेक सितारा ढसाढसा रडली! हा व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी येईल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 18:06 IST

Mahesh Babu आई इंदिरा देवी यांना अखेरचा निरोप देताना महेश बाबूला अश्रू अनावर, नात सितारा ढसाढसा रडली....

Mahesh Babu Mother Indira Devi passes away : साऊथ सिनेमाचा सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu ) याची आई इंदिरा देवी यांचं आज पहाटे निधन झालं. 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. महेश बाबूच्या मोठ्या भावाचं याच वर्षाच्या सुरूवातीला निधन झालं होतं. महेश बाबूनं भावा पाठोपाठ आईला सुद्धा गमावलं. आईला अखेरचा निरोप देताना महेशबाबू प्रचंड भावुक झाला होता. साऊथ इंडस्ट्रीतले बडे स्टार्स इंदिरा देवींच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले. यावेळी महेशबाबूला अश्रू अनावर झाले होते. त्याची लेक सितारा तर आजीचं पार्थिव बघून ढसाढसा रडली.सध्या सोशल मीडियावर  व्हिडीओ व्हायरल होतोय.

या व्हिडीओत सितारा ढसाढसा रडताना दिसत आहे. आई नम्रताच्या खांद्यावर डोकं ठेवून चिमुकली सितारा हुंदके देत रडली. तिला रडताना पाहून महेश बाबूही तिला सावरलं. सिताराचा हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

अन्य एका व्हिडीओत सितरा महेश बाबूच्या मांडीवर बसलेली दिसतेय. तिथेही ती पूर्णवेळ रडतेय आणि तिचा बाबा तिचं सांत्वन करतोय. हा व्हिडीओही अनेकांना भावुक करतोय.

महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचं हैदराबाद येथे निधन झालं.  इंदिरा देवी यांनी बुधवारी (28 सप्टेंबर) पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून इंदिरा देवी यांची प्रकृती बिघडली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इंदिरा देवी या सुपरस्टार कृष्णा  यांच्या पत्नी होत्या. महेश बाबू यांचे वडील आणि सुपरस्टार कृष्णा यांनी दुसरं लग्न केलं होतं. इंदिरा देवी या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. कृष्णा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्या एकट्याच राहत होत्या. महेश बाबू यांच्या अनेक कार्यक्रमात इंदिरा देवी आवर्जून उपस्थित असायच्या.     

टॅग्स :महेश बाबूTollywoodसेलिब्रिटी