Join us  

Photo: नारळपोफळीच्या बागा अन् चिऱ्याचं घर! वनिताचं कोकणातील घरकौलारू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 10:01 AM

Vanita kharat: वनिताच्या नवऱ्याने म्हणजेच सुमित लोंढेनी वनिताच्या कोकणातील घराचा एक सुरेख फोटो शेअर केला आहे.

आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी लोकप्रिय अभिनेत्री आणि कॉमेडियन म्हणजे वनिता खरात (vanita kharat). कलाविश्वाबरोबरच तिचा सोशल मीडियावरही तगडा वावर आहे. त्यामुळे अनेकदा तिच्या युट्यूब चॅनेलवर तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी, किस्से ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र, सध्या वनिताच्या गावच्या घराची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होतीये. वनिताच्या नवऱ्याने म्हणजेच सुमित लोंढेनी वनिताच्या कोकणातील घराचा एक सुरेख फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वनिता मूळची कोकणातील आहे. त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी लागल्याबरोबर ती तिच्या नवऱ्यासोबत कोकणात गेली आहे. सुमितने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने वनिताच्या घराची झलक दाखवली आहे.

कोकणातील देवगड हे वनिताचं मूळ गाव आहे. या गावात तिचं छान कौलारु आणि चिऱ्यांनी (मोठ्या विटा) बांधलेलं घर आहे. विशेष म्हणजे प्रशस्त असलेल्या या घराच्या बाहेर नारळपोफळीच्या बागाही आहेत. त्यामुळे सुमितने खास हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, हा फोटो पाहिल्यावर  नेटकऱ्यांसह कलाकारांनीही त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. वनिताने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सोबतच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. शाहिद कपूरच्या 'कबीर सिंह' या सिनेमात ती झळकली आहे.

टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्रासेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजनशाहिद कपूर