Join us
Daily Top 2Weekly Top 5

समीर चौघुलेंनी राजकुमार रावबरोबर केली स्क्रीन शेअर, व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 16:01 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले हिंदी जाहिरातीत झळकले, राजकुमार रावबरोबर केली स्क्रीन शेअर

अफलातून अभिनय आणि उत्तम विनोदबुद्धी असलेले समीर चौघुले प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून त्यांना प्रसिद्धी मिळाली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत समीर चौघुले प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतात. कधी मिमिक्री तर कधी दरवाजाच्या बेलचा आवाज काढून प्रेक्षकांना हसवणाऱ्या समीर चौघुलेंचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. विविधांगी भूमिका साकारुन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे समीर चौघुले बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावबरोबर स्क्रीनवर झळकले आहेत. 

समीर चौघुलेंची एक हिंदी जाहिरात नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या जाहिरातीत त्यांनी राजकुमार रावबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. एका अॅपची ही जाहिरात असून त्यात समीर चौघुले आणि राजकुमार राव दिसत आहेत. चौघुलेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. समीर चौघुलेंनी राजकुमार रावबरोबर केलेलं काम पाहून चाहतेही आनंदी झाले आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींनीही समीर चौघुलेंचं कौतुक केलं आहे. 

"हिंदू, मुस्लीम, शोषित आणि शोषण करणाऱ्या सर्व जातीमधील...", सुव्रत जोशीच्या पोस्टने वेधलं लक्ष

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मराठी अभिनेत्रीला आकारला गेला तिपट्ट टोल, नितीन गडकरींना टॅग करत म्हणाली...

अभिनयाबरोबर विनोदाची सांगड घालत कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या चौघुलेंनी अनेक मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे. 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका काळेचे मणी या मराठी वेब सीरिजमध्येही ते दिसले होते. याशिवाय त्यांनी 'जग्गू आणि ज्युलिएट', 'बांबू', 'चंद्रमुखी', 'हवाहवाई' या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :समीर चौगुलेमहाराष्ट्राची हास्य जत्राराजकुमार राव