Join us

"एकत्र राहायला लागल्यापासून...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरने आरती मोरेसाठी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:14 IST

लाडकी मैत्रीण आरती मोरेसाठी प्रियदर्शनी इंदलकरची सुंदर पोस्ट.

Priyadarshini Indalkar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya Jatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar). पुण्याची विनम्र अभिनेत्री असा टॅग तिला या शोमुळे मिळाला. चित्रपट, मालिका तसेच वेब सीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्रीचा दांडगा वावर आहे. अगदी अल्पावधीतच तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावर सुद्धा अभिनेत्री सक्रिय असते. त्याद्वारे आपले प्रोजेक्ट्स तसेच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर प्रियदर्शीनीने शेअर केलेली एक पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ही पोस्ट अभिनेत्रीने तिची जिवाभावाची मैत्रीण आरती मोरेसाठी लिहिली आहे. 

दरम्यान, सध्या प्रियदर्शनी इंदलकर आणि आरती मोरे या दोघीही 'विषामृत' या नाटकासाठी एकत्र काम करताना दिसत आहेत. याच नाटकासाठी अभिनेत्री आरती मोरेला 'झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५' मध्ये सहाय्यक भूमिकेसाठी नॉमिनेशन मिळालंय. त्यामुळे आपल्या मैत्रीणीसाठी आनंद व्यक्त करत प्रियदर्शनीने सोशल मीडिया सुंदर शब्दात पोस्ट लिहून ती शेअर केली आहे. "नेहमी इच्छा होती, एकत्र राहायला लागल्यापासून. हिच्यासोबत कधीतरी काम करता यावं, तुझ्याबद्दलचं जे जे कौतुक ऐकिवात होतं. ते तुझ्या सोबत काम करताना खूप जवळून अनुभवलं. किती बारीक बारीक गोष्टींवर काम करतेस. सतत करत राहतेस. नाटकावरचं तुझं प्रेम, तुझ्या वावरातुन दिसत राहतं..राणीचं पात्र तू ज्या पद्धतीने उभं केलयस, ते अक्षरशः प्रेमात पाडणारं आहे! तू खूप काही डिझर्व्ह करतेस, आरती! आणि तुझ्या प्रवासाचा भाग होता आलं याचं मला समाधान आहे." अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.

प्रियदर्शीनीने केलेलं कौतुक पाहून आरतीने तिच्या पोस्टला रिप्लाय देत म्हटलंय की, "आई गं, अण्णा लव्ह यू !! या सगळ्या प्रवासात तुझा खूप मोठा वाटा आहे . तुझे मनापासून आभार तू कायमच मला सपोर्ट केला आहेस आणि तू एक उत्तम को-स्टार सुद्धा आहेस. अत्यंत अभ्यासू वृत्तीने आणि प्रामाणिक पणे काम करत असतेस तू , तुझ्या सोबत कामाची गंमत वाढत जाते . प्रयोग करत राहू आणि त्यानंतरच आपल अविरत चर्चा चालू ठेवू. मला जेव्हा जेव्हा लो फील वाटेल तेव्हा तेव्हा मी तू हे लिहिलेलं वाचेन." सोशल मीडियावर प्रियदर्शनी आणि आरतीची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे. शिवाय आरती मोरेल शुभेच्छा देखील दिल्याच्या पाहायला मिळतायत. 

वर्कफ्रंट

मुळची पुण्याची असलेल्या  प्रियदर्शनीने 'ई टीव्ही मराठी' या वाहिनीवरील 'अफलातून लिटील मास्टर्स' या कार्यक्रमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. प्रियदर्शिनी 'फुलराणी' या मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया