Join us
Daily Top 2Weekly Top 5

"चाहत्यांचे प्रेम हीच...".महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुले झाला भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 18:52 IST

अभिनेता समीर चौगुले हा आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा रंगत असते.

मराठी कलाविश्वात आज असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे समीर चौगुले. उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीमुळे हा अभिनेता आज घराघरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो. त्यामुळेच त्याला चाहत्याकडून एक खास गिफ्ट मिळलं आहे. 

समीर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. त्याला चाहत्याकडून एक खास गिफ्ट मिळालंय त्याचा फोटो समीरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. समीरच्या चाहत्याने त्याची हुबेहूब रांगोळी काढली आहे. या रांगोळीमध्ये त्यांनी समीर चौघुलेच्या शेजारी विनोदवीर चार्ली चॅप्लिन यांची देखील रांगोळी काढली आहे. मदन कावळे यांनी ही रांगोळी काढली आहे. ही  रांगोळी पाहून समीर चौघुले भावुक झाला आहे. 

त्याने या रांगोळीचा फोटो शेअर करताना लिहिले, ''चाहत्यांचे प्रेम हीच खरी ऊर्जा असते..गोरेगाव येथे रांगोळी प्रदर्शनात श्री. मदन कावळे यांनी माझी अतिशय सुंदर रांगोळी काढली...मनापासून आभार आणि प्रेम''.

दरम्यान अभिनेता समीर चौगुले हा आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे पडद्यावर वावरणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यातही अत्यंत साधा आहे. त्यामुळे त्याच्या याच साधेपणामुळे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

टॅग्स :समीर चौगुलेमहाराष्ट्राची हास्य जत्रा