Join us
Daily Top 2Weekly Top 5

"भावा..तू तो अपना शेर है...", गौरव मोरेसाठी समीर चौघुलेनी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 13:14 IST

गौरवच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एक हरहुन्नरी कलाकार आणि ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणजे गौरव मोरे. सध्या गौऱ्या म्हणजे चाहत्यांचा लाडका कलाकार. त्याच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत.‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून त्यानं मालिकाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तो विनोदी भूमिका करत होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती  महाराष्ट्राची हास्यजत्रामधून. यानंतर गौरवने कधीच मागे वळून पाहिले नाही.  गौरवाचं मराठी चित्रपट आणि मालिकेतील त्याचं काम पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याला संधी मिळाली. संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपटातील त्याच्या कामाची चांगली वाहवा झाली.

गौरवच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेने एक खास पोस्ट शेअर केली आहे. समीरने गौरवचा हास्यजत्रेच्या मंचावरचा फोटो शेअर केला आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गौरव देविदास मोरे. भावा..तू तो अपना शेर है.....तुझ्या बद्धल मी काय लिहिणार!! अत्यंत वेगळी विनोदाची शैली असलेला आमचा गौऱ्या अल्पावधीतच जगातल्या मराठी माणसांच्या गळ्यातला ताईत झालाय...आज आमच्या गौऱ्याचे आबाल वृध्द fan आहेत यातच त्याची मेहेनत आणि कामावरील प्रेम दिसून येते.....तुझ्यातली उत्स्फूर्तता आणि तुझ्या वर रसिकांचे असलेले प्रेम कायम राहो....आणि तुला जे जे आयुष्या कडून हवंय ते दुपटीने मिळो..भावा..वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..... 

दरम्यान गौरवाचं मराठी चित्रपट आणि मालिकेतील त्याचं काम पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याला संधी मिळाली. संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपटातील त्याच्या कामाची चांगली वाहवा झाली.

अभिनय कौशल्याच्या जोरावर गौरवने मराठी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी छाप उमटविली आहे. काही दिवसांपूर्वीच तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. गौरवने ‘हवाहवाई’ चित्रपटात काम केले आहे. त्याचा फॅन फॉलोव्हिंग मोठा आहे. विनोदी अभिनयाने त्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.

 

टॅग्स :समीर चौगुलेटिव्ही कलाकार