Join us

माधुरी दिक्षितने हॉकी स्टीक घेऊन केला आमीरचा पाठलाग

By admin | Updated: June 2, 2016 12:11 IST

धकधक गर्ल माधुरी दिक्षितने परफेक्शनिस्ट आमीर खानचा चक्क हॉकी स्टीक घेऊन पाठलाग केला होता. स्वत: माधुरी दिक्षितने हा किस्सा सांगितला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 02 - धकधक गर्ल माधुरी दिक्षितने परफेक्शनिस्ट आमीर खानचा चक्क हॉकी स्टीक घेऊन पाठलाग केला होता. स्वत: माधुरी दिक्षितने हा किस्सा सांगितला आहे. 1990 मधील सुपरहिट चित्रपट 'दिल'च्या शुटिंगदरम्यान मी हॉकी स्टीक घेऊन आमीर खानच्या मागे धावले होते अशी आठवण तिने सांगितली आहे. 
 
माधुरी दिक्षितने ट्विटरवर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आपण केलेल्या खोडकर गोष्टी माधुरीने शेअर केल्या. 'दिल चित्रपटाच्या सेटवर आमीर खानने माझी खोड काढली होती तेव्ही मी हॉकी स्टीक घेऊन त्याचा पाठलाग केला होता', ही आतापर्यंत मी केलेली खोडकर गोष्ट असल्याचं', माधुरी दिक्षितने सांगितलं.  
 
1990मध्ये आलेल्या 'दिल' चित्रपटात पहिल्यांदा आमीर खान आणि माधुरी दिक्षीत जोडी एकत्र दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 1984मध्ये माधुरी दिक्षितने 'अबोध' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 2014 मध्ये आलेल्या 'गुलाबी गँग' चित्रपटात माधुरी शेवटची दिसली होती.