बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या तिच्या एका मोठ्या व्यावसायिक व्यवहारामुळे चर्चेत आली आहे. माधुरीने मुंबईतील लोअर परळ या उच्चभ्रू भागात एक आलिशान कार्यालयीन जागा (कमर्शियल ऑफिस स्पेस) भाड्याने घेतली आहे. माधुरीने घेतलेले हे कार्यालय लोअर परळमधील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'वन लोढा प्लेस' (One Lodha Place) या इमारतीत आहे.
माधुरी दीक्षितनं या ५ वर्षांच्या (६० महिने) करारासाठी तब्बल २.८१ कोटी रुपये भाडे मोजणार असल्याचे समोर आले आहे. ७३१ चौरस फूट 'कार्पेट एरिया' असलेल्या या जागेसाठी माधुरीने १७ लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरले आहे. ७२,६०० रुपये स्टॅम्प ड्युटी देखील भरण्यात आली आहे. हा व्यवहार नुकताच नोंदणीकृत झाला आहे. या ऑफिससोबत एक कार पार्किंगची सुविधाही देण्यात आली आहे.
दरवर्षी भाड्यात वाढ
या भाडे करारानुसार दरवर्षी भाड्यात ५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत या कार्यालयाचे मासिक भाडे ५ लाख रुपयांच्या पुढे जाणार आहे. पहिल्या वर्षी दरमहा ४.२५ लाख रुपये, दुसऱ्या वर्षी ४.४६ लाख रुपये, तिसऱ्या वर्षी ४.६८ लाख रुपये, चौथ्या वर्षी ४.९१ लाख रुपये आणि पाचव्या वर्षी ५.१६ लाख रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे.
याआधीही मोठी खरेदी
माधुरीने यापूर्वी २०२२ मध्ये वरळी भागात समुद्रकिनारी एक आलिशान 'सी-व्ह्यू' अपार्टमेंट खरेदी केले होते. लोअर परळ आणि वरळी हे भाग सध्या मुंबईतील सर्वात मोठे 'प्रीमियम हब' म्हणून विकसित झाले आहेत. हाय स्ट्रीट फिनिक्स आणि पॅलेडियम सारखे मॉल्स जवळ असल्याने या परिसराची मागणी सातत्याने वाढत आहे. बीकेसी (BKC) आणि नरिमन पॉईंटशी असलेली उत्तम कनेक्टिव्हिटी यामुळे अनेक सेलिब्रिटी आणि उद्योजक या भागाला पसंती देत आहेत.
Web Summary : Madhuri Dixit leased a Lower Parel office in 'One Lodha Place' for ₹4.25 lakh monthly. The 731 sq ft space has a 5% annual rent increase, reaching ₹5.16 lakh in the final year. She also owns a Worli sea-view apartment.
Web Summary : माधुरी दीक्षित ने लोअर परेल में 'वन लोढ़ा प्लेस' में ऑफिस किराए पर लिया, जिसका मासिक किराया ₹4.25 लाख है। 731 वर्ग फुट की जगह का किराया सालाना 5% बढ़ेगा, जो अंतिम वर्ष में ₹5.16 लाख तक पहुंच जाएगा। उनके पास वर्ली में समुद्र के किनारे एक अपार्टमेंट भी है।