Join us
Daily Top 2Weekly Top 5

"चांद तू नभातला...", माधुरी दीक्षितच्या बर्थडेला रोमँटिक झाले पती श्रीराम नेने, बायकोसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 18:04 IST

डॉक्टर नेनेंनी माधुरीसोबतचा खास रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला "चांद तू नभातला" हे गाणं देऊन त्यांनी मराठी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

Madhuri Dixit Birthday: बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या माधुरीच्या वाढदिवशी पती डॉक्टर श्रीराम नेनेंनी खास पोस्ट शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टर नेनेंनी माधुरीसोबतचा खास रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला "चांद तू नभातला" हे गाणं देऊन त्यांनी मराठी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

"माझी प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आमच्या प्रत्येकाला नेहमीच साथ दिल्याबद्दल आणि प्रेम दिल्याबद्दल खूप धन्यवाद", असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. डॉ. नेनेंचं मराठीवरील प्रेम पाहून चाहते थक्क झाले आहेत. त्यांनी या व्हिडीओला "चांद तू नभातला" हे मराठी गाणं बॅकग्राऊंडला दिल्याने चाहत्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. श्रीराम नेने अनेकदा माधुरीसाठी पोस्ट शेअर करताना दिसतात. 


माधुरी दीक्षित आज तिचा ५९वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने १९९९ साली डॉक्टर असलेल्या श्रीराम नेने यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही वर्ष ते अमेरिकेत होते. ते एक लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. त्या दोघांना अरिन आणि रयान ही दोन मुले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Madhuri Dixit's Birthday: Husband Shriram Nene's Romantic Post Wins Hearts

Web Summary : Madhuri Dixit celebrates her birthday, receiving heartfelt wishes from her husband, Dr. Shriram Nene. He shared a romantic video with a Marathi song, expressing his love and gratitude for her constant support. The couple married in 1999 and have two children.
टॅग्स :माधुरी दिक्षितसेलिब्रिटी