Join us

या कारणाने संजय दत्तसोबत पुन्हा काम करणार माधुरी दीक्षित, ठेवली ही अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 11:09 IST

तब्बल 21 वर्षांनी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. करण जोहरच्या 'कलंक' सिनेमात हे दोघे दिसणार आहेत.

मुंबई : तब्बल 21 वर्षांनी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. करण जोहरच्या 'कलंक' सिनेमात हे दोघे दिसणार आहेत. दोघेही शेवटचे 1997 मध्ये आलेल्या महानता सिनेमात एकत्र दिसले होते. मीडिया रिपोर्टनुसार संजय दत्त 'कलंक' या सिनेमात आधीच कास्ट करण्यात आला होता. आधी हा सिनेमा माधुरीने नाकारला होता. पण आता माधुरीने हा सिनेमा पुन्हा का स्वीकारला याचं कारण पुढे आलं आहे. 

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, या सिनेमात माधुरी आणि संजयमध्ये जास्त क्लोजअप सीन्स नसणार आहेत. याच कारणाने माधुरी संजय दत्तसोबत या सिनेमात करण्याय तयार झाली. हे दोघेही अपोझिट कास्ट करण्यात आले आहेत मात्र दोघांमध्ये जास्त सीन्स नसणार आहेत. 

माधुरीने हा सिनेमा साईन करण्यापूर्वी फिल्ममेकर्सना डिमांड केली होती. त्यानुसार सिनेमाची कथा माधुरीची डिमांड लक्षात ठेवून रचण्यात आली आहे. याआधी माधुरीची भूमिका श्रीदेवी करणार होत्या

दोघांच्या अफेअरची चर्चा

90च्या दशकात माधुरी आणि संजय दत्त या जोडीने साजन, खलनायक आणि थानेदार या सिनेमात एकत्र काम केलं होतं. एकेकाळी दोघांच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगली होती. मीडिया रिपोर्टनुसार, दोघे इतके प्रेमात होते की, लग्नही करणार होते. पण संजय दत्तचं आधीच लग्न झालेलं होतं. त्यानंतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये तो अडकला होता. अशावेळी माधुरीने त्याची साथ सोडली. 

कलंकची स्टारकास्ट

कलंक हा सिनेमा करण जोहर, साजिद नाडियाडवाला आणि फॉक्स स्टुडिओ मिळून करत आहेत. अभिषेक बर्मन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमात माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, आलिया भट्ट आणि वरुण धवन असणार आहेत.

टॅग्स :बॉलिवूडमाधुरी दिक्षित