Join us
Daily Top 2Weekly Top 5

मादाम तुसाँ आता भारतातही, अमिताभ बच्चन यांच्या पुतळ्याचे अनावरण

By admin | Updated: January 13, 2017 08:33 IST

'मादाम तुसाँ ' या विख्यात संग्रहालयाची शाखा भारतातही सुरू होत असून जून महिन्यात राजधानी नवी दिल्ली येथे शाखेचे अनावरण होणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ -  जगभरातील प्रसिद्ध व्यक्तीमत्वांचे हुबेहुब मेणचे पुतळे साकारणा-या लंडनमधील 'मादाम तुसाँ ' या विख्यात संग्रहालयाची शाखा भारतातही सुरू होत असून जून महिन्यात राजधानी नवी दिल्ली येथे शाखेचे अनावरण होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल संग्रहालयातर्फे बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. तसेच पॉपस्टार लेडी गागा हिच्याही पुतळ्याचे अनावरण झाले. 
भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये २०१७ हे सांस्कृतिक देवाणघेवाणीचे वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर भारतातही 'मादाम तुसाँ'ची एक शाखा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिल्लीतील क२नॉट प्लेस या भागात हे संग्रहालय जून महिन्यापासून सुरू होणार असून चाहत्यांना आपल्या लाडके कलाकार, जगप्रसिद्ध व्यक्तींच्या पुतळ्यांसोबत फोटो काढता येतील. 
(मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये दाखल होणार नरेंद्र मोदींचा पुतळा)
(कपिल शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा, मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये दाखल होणार पुतळा)
 
 
शहनेशहा अमिताभ बच्चन व लेडी गागा यांच्याशिवाय दिल्लीतील या संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचाही समावेश असेल.