Join us

दबंगसोबत प्रीती अमेरिकेत

By admin | Updated: September 15, 2014 14:19 IST

माजी बॉयफ्रेंड नेस वाडियाच्या विरोधात गैरवतनाचे आरोप केल्यानंतर अभिनेत्री प्रीती झिंटा चर्चेत आली आहे. प्रीती कुठेही गेल्यास तिला याबाबत प्रश्न विचारून भंडावून सोडले जात

माजी बॉयफ्रेंड नेस वाडियाच्या विरोधात गैरवतनाचे आरोप केल्यानंतर अभिनेत्री प्रीती झिंटा चर्चेत आली आहे. प्रीती कुठेही गेल्यास तिला याबाबत प्रश्न विचारून भंडावून सोडले जात होते. हे टाळण्यासाठी ती चक्क अमेरिकेला परत गेली आहे. ‘दबंग’ या नावाने ओळखला जाणारा सलमान खान हादेखील सध्या अमेरिकेत असून, प्रीती झिंटासोबत तो अनेक वेळा दिसून येत आहे. शॉपिंग करताना, तसेच एकत्रित डिनर करताना प्रीती आणि सलमान यांना पाहण्यात आल्याचा दावा मीडियाने केला आहे. सलमान आणि प्रीती जुने मित्र आहेत. या दोघांमध्ये आता काय शिजत आहे, असे प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. अडचणीत सापडलेल्या प्रीतीला सलमान मदत करीत असल्याची चर्चा आहे.