Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभूने जागवल्या आठवणी

By admin | Updated: September 8, 2016 03:37 IST

प्रभू देवा आज बॉलीवूडमधला सर्वांत चांगला डान्सर मानला जातो. ‘डान्स प्लस’ या कार्यक्रमाचा परीक्षक रेमो डिसोझाही त्याला आपला गुरू मानतो.

प्रभू देवा आज बॉलीवूडमधला सर्वांत चांगला डान्सर मानला जातो. ‘डान्स प्लस’ या कार्यक्रमाचा परीक्षक रेमो डिसोझाही त्याला आपला गुरू मानतो. प्रभू देवाने ‘तुतक तुतक तुतीया’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनू सूदसोबत नुकतीच ‘डान्स प्लस’च्या सेटवर हजेरी लावली होती. त्याच्या येण्याने स्पर्धकांसोबत मेन्टॉरही खूश झाले होते. स्पर्धकांनी तर त्याच्यासमोर आपले सर्वोत्तम परफॉर्मन्स सादर केले, पण त्याचसोबत मेन्टॉर आणि सूत्रसंचालकांनीही प्रभूसमोर नृत्य करण्याची संधी सोडली नाही. सगळे मेन्टॉर आणि सूत्रसंचालक राघव जुयाल यांनी आपल्या आयकॉनसमोर नृत्य सादर केले. प्रभू देवा यांचे मुकाबला या गाण्यातील नृत्य तर प्रेक्षकांना वेड लावते. प्रभूने या गाण्यावरील नृत्य सादर करतानाच सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.