Join us
Daily Top 2Weekly Top 5

फराहसाठी प्रभू देवा सर्वात विनम्र व्यक्ती

By admin | Updated: September 11, 2016 02:52 IST

बॉ लिवूडमध्ये कोरिओग्राफर-दिग्दर्शकांची एक मोठी फळीच निर्माण होतेय. फराह खान, प्रभू देवा, रेमो डीसूझा, अहमद खान असे अनेक कोरिओग्राफर सध्या इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक म्हणूनही जम बसवून आहेत

बॉ लिवूडमध्ये कोरिओग्राफर-दिग्दर्शकांची एक मोठी फळीच निर्माण होतेय. फराह खान, प्रभू देवा, रेमो डीसूझा, अहमद खान असे अनेक कोरिओग्राफर सध्या इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक म्हणूनही जम बसवून आहेत. प्रभू देवाच्या ‘तुतक तुतक तुतिया’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच प्रसंगी फराह खान उपस्थित होती. यावेळी ती म्हणाली की, ‘‘प्रभू बॉलिवूडमधील सर्वात विनम्र व्यक्ती आहे. तो एवढा महान डान्सर असूनही त्याला गर्व नाही. शांत, मितभाषी आणि प्रसंगी लाजाळू असे त्याचे व्यक्तीमत्व आहे. ‘सपने’ चित्रपटात मला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे.’ सोनू सूद या सिनेमाद्वारे निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. 7 आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या फिल्ममध्ये फराह पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.