Join us

अ‍ॅक्सन जॅक्सनच्या ट्रेलरमध्ये प्रभू देवा

By admin | Updated: October 23, 2014 01:03 IST

बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट दिग्दर्शक आहेत, ज्यांची त्यांच्या चित्रपटात झलक दिसत असते.

बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट दिग्दर्शक आहेत, ज्यांची त्यांच्या चित्रपटात झलक दिसत असते. सुभाष घई नेहमीच त्यांच्या चित्रपटांमध्ये अगदी लहानशा भूमिका साकारताना दिसतात. फराह खान आणि रोहित शेट्टी चित्रपटांच्या एंड क्रेडिटमध्ये दिसतात. आता या यादीत प्रभू देवाच्या नावाचाही सहभाग झाला आहे. प्रभू देवा इतर दिग्दर्शकांपेक्षा एक पाऊल पुढे आहे, कारण तो त्याच्या आगामी अ‍ॅक्शन जॅक्सन या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसणार आहे. निर्मात्यांचा दावा आहे की, बॉलीवूडमध्ये असे पहिल्यांदाच होणार आहे. बॉलीवूडमध्ये नवे चलन सुरू करायची प्रभू देवाची इच्छा आहे. तो चित्रपटातील एका गाण्यातही दिसणार आहे; पण ते गाणे ट्रेलरमध्ये दिसणार नाही. तो चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये दिसत आहे. अ‍ॅक्शन जॅक्सनमध्ये अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, यामी गौतम आणि भारतीय सुपरमॉडेल मनस्वी ममगई मुख्य भूमिकेत आहेत.