Join us

सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त 'नूर'ची झलक

By admin | Updated: June 2, 2016 17:00 IST

दबंग सिनेमातल्या अभिनयानं लोकांवर भुरळ घालणा-या सोनाक्षी सिन्हाचा आज 29वा वाढदिवस आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 2-  दबंग सिनेमातल्या अभिनयानं लोकांवर भुरळ घालणा-या सोनाक्षी सिन्हाचा आज 29वा वाढदिवस आहे. वाढदिवसादिवशीची तिनं 'नूर' या सिनेमाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
शूटिंग आणि प्रोजेक्टमध्ये व्यस्त असलेली सोनाक्षी स्वतःच्या वाढदिवशीच नूर या तिच्या आगामी चित्रपटाची व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांना झलक दाखवणार आहे. नूर सिनेमाचे निर्माता सुन्हिल सिप्पी असून, सिनेमात सोनाक्षी सिन्हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.  ती या सिनेमात कराचीतल्या एका पत्रकाराची भूमिका करणार आहे.
"ती प्रत्येक मुलगी आहे. ती नूर आहे. मीसुद्धा नूर आहे. लवकरच नूरमध्ये मी दिसणार आहे. तुम्हाला नूर आवडेल अशी आशा आहे', असं सोनाक्षी सिन्हानं टि्वट केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यास सोनाक्षी नूर सिनेमात वेगवेगळे मूड्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.