'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून अभिनेत्री अभिज्ञा भावे रसिक प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली.अभिज्ञा भावे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असलेली आणि करोडोंच्या हृदयात स्थान मिळवलेली अभिज्ञा भावे. नाना विविध फोटोशूटमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.अभिनेत्री अभिज्ञा भावे मराठीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. लोकमत डिजीटल अवॉर्ड दिमाखदार सोहळ्यात Josh Marathi Superstar (Female) म्हणून अभिज्ञा भावेचा सन्मान करण्यात आला. Josh Marathi Superstar (Female) पुरस्काराने तिला गौरवण्यात आलंय.
Lokmat DIA: अभिज्ञा भावेचा जोश मराठी सुपरस्टार पुरस्कारानं गौरव; लोकमतकडून सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 18:53 IST