Join us  

असा व्हिडीओ यापूर्वी कधीच पाहिला नसेल, डिलीट होण्यापूर्वी प्रेग्नंट लीजा हेडनचा हा व्हिडीओ बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 1:13 PM

मध्यंतरी तिने व्हिडीओ शेअर केला होता. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आळसामुळे मी माझ्या प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांना देऊ शकली नाही, असे ती या व्हिडीओत म्हणते आणि मग कॅमेरा तिचा मुलगा जॅककडे वळतो.

अभिनेत्री आणि मॉडेल लीसा हेडन सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिच्या संदर्भातील प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसह शेअर करत असते. त्यामुळेच सोशल मीडियावर लीसा हेडनच्या फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे दुस-यांदा आई होण्यापासून ते बाळाला जन्म दिल्यापर्यंत सगळ्याच अपडेट लीसाने सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. प्रेग्नंसीमध्ये 9 व्या महिन्यात बिकीनी फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. लीसा आता दोन मुलांची आई असल्यामुळे मदरहुड एन्जॉय करतेय.

नुकतेच लीजाने कुटुंबासह बेबी शॉवर केले. त्याचा व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत लीजा बेबी बंम्प फ्लॉन्ट करताना दिसते. कुटुंब आणि मित्रांसह ती मस्त एन्जॉय करताना दिसतेय. इतकेच काय तर लीजा डान्स करतानाही दिसते. सध्या तिचा हा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी व्हिडीओला पसंती देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनही दिली आहे. ''कदाचित नंतर हा व्हिडीओ डिलीटही होऊ शकतो'' अशा आशयाची कॅप्शन असल्यामुळे सा-यांचे लक्ष कॅप्शनने जास्त वेधले आहे.

लीसाच्या पहिल्या प्रेग्नंसीचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. प्रेग्नंसीकाळात तिने केलेल्या बोल्ड फोटोशूटचीही प्रचंड चर्चा झाली होती. तिस-यांदा प्रेग्नंट असलेली लीजा पुन्हा एकदा त्याच कारणामुळे सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मध्यंतरी तिने व्हिडीओ शेअर केला होता. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती  आळसामुळे मी माझ्या प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांना देऊ शकली नाही, असे ती या व्हिडीओत म्हणते आणि मग कॅमेरा तिचा मुलगा जॅककडे वळतो. यानंतर मम्मीच्या टमीमध्ये काय आहे, हे तू सांगणार का? असा प्रश्न लीजा मुलाला विचारते.  यावर बेबी सिस्टर, असे जॅक म्हणतो. लीजानेने हा व्हिडीओ शेअर करताना 3 जून ही तारीख लिहिली आहे. म्हणजेच, ती 3 जूनला बाळाला जन्म देणार आहे. 

क्वीन आणि शौकीन सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री लीजा हेडन सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. लीजा तिस-यांदा बाळाला जन्म देणार असल्याची गुड न्युज तिने चाहत्यांसह शेअर केली होती. 2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नानंतर सात महिन्यांनी म्हणजे १७ मे २०१७ रोजी लीसा ने मुलाला जन्म दिला होता. मुलासोबतचे अनेक फोटो लीसा सोशल मीडियावर शेअर करत असते. 

टॅग्स :लीसा हेडन