Join us  

34 व्या वर्षी लीसा हेडन तिसऱ्यांदा होणार आई; सांगितले मुलगा होणार की मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 10:25 AM

व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

ठळक मुद्देलीसा  अखेरीस ‘ऐ दिल है मुश्किल; या चित्रपटात बघावयास मिळाली होती.

बॉलिवूड स्टार व मॉडेल लीसा हेडन तिसऱ्यांदा  आई होणार आहे. होय, लीसाने एक व्हिडीओ शेअर करत खुद्द ही गुड न्यूज चाहत्यांशी शेअर केली आहे. तिसºया बाळाला कधी जन्म देणार, ते सुद्धा तिने सांगितले आहे. लीजाने सोमवारी एक व्हिडीओ शेअर केला. आळसामुळे मी माझ्या प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांना देऊ शकली नाही, असे ती या व्हिडीओत म्हणते आणि मग कॅमेरा तिचा मुलगा जॅककडे वळतो. यानंतर मम्मीच्या टमीमध्ये काय आहे, हे तू सांगणार का? असा प्रश्न लीसा मुलाला करते. यावर बेबी सिस्टर, असे जॅक म्हणतो. लीसाने हा व्हिडीओ शेअर करताना 3 जून ही तारीख लिहिली आहे. म्हणजेच, ती 3 जूनला बाळाला जन्म देणार आहे.

क्वीन आणि  शौकीन  सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी  लीसा  2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नानंतर सात महिन्यांनी म्हणजे 17  मे  2017 रोजी लीसा ने मुलाला जन्म दिला होता. यानंतर 2020 मध्ये तिच्या दुसºया मुलाचा जन्म झाला होता.

लीसाने 2010 मध्ये ‘आयशा’ या चित्रपटातून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनम कपूर लीड रोलमध्ये होती.लीसाचा पती डिनो हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश एंटरप्रेन्योर गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे.

लीसा  अखेरीस ‘ऐ दिल है मुश्किल; या चित्रपटात बघावयास मिळाली होती. लीसा ने  आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३  आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.  

टॅग्स :लीसा हेडन