Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेखाशी किशोरी शहाणे यांची तुलना

By admin | Updated: November 6, 2015 02:58 IST

मराठी अभिनेते किंवा अभिनेत्रींची बॉलीवूडमधील कलाकारांसोबत कम्पॅरिझन करायची, हे काही तसे नवीन नाही. कधी पार्ट्यांमधून, तर कधी कॉन्ट्रव्हर्सीमुळे

मराठी अभिनेते किंवा अभिनेत्रींची बॉलीवूडमधील कलाकारांसोबत कम्पॅरिझन करायची, हे काही तसे नवीन नाही. कधी पार्ट्यांमधून, तर कधी कॉन्ट्रव्हर्सीमुळे त्या कायमच चर्चेत असतात. त्याला बरीच कारणेही आहेत. आता हेच पाहा ना, अभिनेत्री किशोरी शहाणे आजही पूर्वीइतकीच तरुण दिसते. अर्थात तिने स्वत:ला तितकेच मेन्टेन केले आहे. त्याचप्रमाणे बॉलीवूड अभिनेत्री रेखा आजही अभिनयात, सौंदर्यामध्ये तरुण असल्यासारखेच पाहायला मिळते. पण किशोरी शहाणेंबद्दल बोलायचे झाले तर त्या आजवर कधीच कोणत्याही कॉन्ट्रव्हर्सीमध्ये अडकल्या नाहीत. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिळवलेली जागा आजही अबाधित आहे. त्यामुळेच आज किशोरी शहाणेंची तुलना रेखासारख्या हॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्रीशी होताना पाहायला मिळत आहे.