सलमान खानचा नुकताच ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी बॉलीवूडमधील सर्व तारे-तारकांनी हजेरी लावली. लुलिया वंतुर ही देखील तिथे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. पनवेल येथे झालेल्या सलमानच्या पार्टीत तिने स्वत: सलमानची पत्नी असल्याप्रमाणे सर्वांची विचारपूस केली. आदरातिथ्य केले. तिने नुकताच एक फोटो ट्विटरवर शेअर केला असून, त्यात ती फार्महाउसवर सलमानच्या घोडयावर घोडेस्वारी करत आहे. तिने लिहिले आहे की,‘आॅलवेज लूक अहेड..हॉर्सराइडिंग..गॅलोपिंग..टू न्यू ईअर २०१६ रेडी...’
लुलियाची घोडेस्वारी !
By admin | Updated: January 6, 2016 01:31 IST