बॉलीवूडचे दिग्दर्शकही चित्रपटात काम करू शकतात ते करण जोहरने दाखवून दिले होते. त्याच्यानंतर मात्र कोणताच दिग्दर्शक अभिनय करण्यासाठी पुढे आला नाही. त्यामुळे फक्त करण जोहरच चित्रपटांमध्ये काम करू शकतो हा गैरसमज मोडीत काढत ‘गंगाजल 2’मधून दिग्दर्शक प्रकाश झा अभिनय क्षेत्रात ‘एन्ट्री’ करणार आहेत. ‘राजनीती’सारखा कॅमियो बनवल्यानंतर प्रकाश झा आता नकारात्मक पोलीस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये दिसणार आहेत. या रोलसाठी झा यांची अभिनेत्यांसाठी सुरू असलेली शोधमोहीम अखेर स्वत:वरच येऊन संपली आहे. चित्रपटातील या नकारात्मक रोलसाठी त्यांनी एका तरुण आयपीएस अधिकाऱ्याच्या अनुभवांमधून धडे घेतले आहेत.
प्रकाश झा आता कॅमेऱ्यासमोर!
By admin | Updated: January 22, 2015 23:40 IST