Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृण्मयी गिरवतेय ‘कुंग फू’चे धडे!

By admin | Updated: May 14, 2017 01:14 IST

बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार हे चित्रपटासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतात

बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार हे चित्रपटासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतात हे आपणा सर्वांना माहितीच आहे, पण आता मराठी कलाकारदेखील मागे नाही आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या मराठी अभिनेत्रीने चक्क कुंग फूचे धडे घेतले आहेत. मृण्मयी गोडबोलेने नुकतेच कुंग फूचे प्रशिक्षण घेतले आहे. मृण्मयी तिच्या कुंग फू प्रशिक्षणाबद्दल सांगते, ‘मी या आधी ‘कलरीपयट्टू’ शिकली आहे आणि १०वर्षे मी बास्केटबॉलसुद्धा खेळली आहे. (राष्ट्रीय पातळीवरही खेळली आहे) पण मी या आधी कुंग फू कधीच शिकले नव्हते. कुंग फूची क्रेझ मला आधीपासून असल्यामुळे मी याचे प्रशिक्षण घ्यायचे ठरवले. यावेळी मला माझ्या कलरीपयट्टू आणि बास्केटबॉल ट्रेनिंगची खूप मदत झाली. माझ्या ट्रेनरनेही खूप ट्रेनिंग देऊन कठीण व्यायाम व स्ट्रेचिंग करून घेतले. आता मला असं वाटतंय, मी एका महिन्यात वर्षभराचं कुंग फू शिकलेय. कुंग फू शिकण्याची प्रक्रिया खूप कडक आणि थकवणारी होती. पण माझ्यासाठी कुंग फू शिकणे एक रोमांचकारी अनुभव होता.