Join us
Daily Top 2Weekly Top 5

लिओनार्डोला आॅस्कर मिळाल्याने सिद्धार्थ हॅपी

By admin | Updated: March 2, 2016 01:58 IST

जगभरातून आॅस्कर अ‍ॅवॉर्डकडे मोस्ट अवेटेड, ग्लॅमरस अ‍ॅवॉर्ड म्हणूनच पाहिले जाते. चित्रपटांमध्ये अभिनयाचा कस लावणारे अ‍ॅक्टर्स या अ‍ॅवॉर्डसाठी फारच उत्सुक असून आपल्यालाही तो केव्हा तरी मिळावा

जगभरातून आॅस्कर अ‍ॅवॉर्डकडे मोस्ट अवेटेड, ग्लॅमरस अ‍ॅवॉर्ड म्हणूनच पाहिले जाते. चित्रपटांमध्ये अभिनयाचा कस लावणारे अ‍ॅक्टर्स या अ‍ॅवॉर्डसाठी फारच उत्सुक असून आपल्यालाही तो केव्हा तरी मिळावा, याच्याच प्रतीक्षेत असतात. एखाद्या अभिनेत्याला आॅस्कर मिळाला म्हणून दुसरा अभिनेता खूष झाला असे ऐकले, तर आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल; परंतु चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर हा लिओनार्डोला बेस्ट अ‍ॅक्टर म्हणून आॅस्कर मिळाला, यासाठी खूष झाला आहे. गेल्या १२ वर्षांपासून लिओनार्डो आॅस्करच्या प्रतीक्षेत होता. शेवटी त्याला या वर्षी आॅस्करच्या ट्रॉफीला हात लावता आला. सिद्धार्थ म्हणतोय, अँड ही गेट्स इट धिस टाइम, दॅट्स मोअर लाइक इट... लिओ गेल्या १२ वर्षांपासून आॅस्करसाठी स्पीच तयार करीत होता, असे त्याने पुरस्कार स्वीकारताना सांगितले आहे. लिओनार्डोच्या या हॅपी मोमेंट्सना आपणही शुभेच्छा देऊ या.