Join us

लेकीला मॉमच्या टिप्स

By admin | Updated: October 28, 2016 04:27 IST

एक जमाना गाजविणाऱ्या अन् आता आईच्या भूमिकेत आपल्या लेकीला पदोपदी साथ देणाऱ्या सेलिब्रिटिज मॉम्स पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ‘शिवाय’मधून बॉलिवूडमध्ये

- Satish Dongre

एक जमाना गाजविणाऱ्या अन् आता आईच्या भूमिकेत आपल्या लेकीला पदोपदी साथ देणाऱ्या सेलिब्रिटिज मॉम्स पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ‘शिवाय’मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी सायशा सैगल हिला तिची आई अन् एकेकाळची बॉलिवूड अभिनेत्री शाहिन बानू या पावलोपावली मार्गदर्शन करताना बघावयास मिळत आहेत. याचा प्रत्यय नुकताच मुंबई येथे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आला. मराठी माध्यमांशी बोलताना प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा मराठी भाषेत कशा द्याव्यात यासाठी शाहीन सायशाला टिप्स देत होत्या. विशेष म्हणजे शाहीन यांनी ‘दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा’ हे वाक्य सायशाकडून 3-4 वेळा वदवून घेतले. लेकीसाठीची शाहीनची ही धडपड नक्कीच बघण्यासारखी होती; मात्र शाहीनप्रमाणे इतरही काही स्टार मॉम्स आहेत, ज्या लेकीच्या यशात खारीचा वाटा उचलत आहेत. अमृता सिंगअतिशय खोडकर आणि तेवढीच डॅशिंग अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या अमृता सिंग हिची मुलगी सारा इब्राहिम हिच्या बॉलिवूड एंट्रीबाबतदेखील विविध कयास लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने सारा सार्वजनिक ठिकाणी बघावयास मिळत आहे, त्यावरून तिची बॉलिवूड एंट्री निश्चित मानली जात आहे; मात्र साराने अगोदर शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करावे अशी अमृताची इच्छा असून, सध्या ती तिच्या शिक्षणाकडे लक्ष देत आहे. त्याचबरोबर तिचा ग्लॅमरस अंदाज जपण्यातही ती कुठलीच कसर करीत नसल्याचे वेळोवेळी बघावयास मिळत आहे. श्रीदेवीएकेकाळी बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री असा लौकिक असलेली अभिनेत्री श्रीदेवी हिची मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. जान्हवी नेहमीच बॉलिवूड पार्ट्यांमध्ये तिच्या ग्लॅमरस लुकमध्ये बघावयास मिळते. ज्या पद्धतीने ती स्वत:ला तयार करीत आहे, त्यावरून ती लवकरच पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे; मात्र तिच्या या ग्लॅमरस अंदाजात आई श्रीदेवी हिचा मोलाचा वाटा आहे. बऱ्याचदा तिने आईसोबत पार्ट्या तसेच सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावून उपस्थिताना सुखद धक्का दिला. त्यामुळे जान्हवीच्या बॉलिवूड एंट्रीमध्ये आई श्रीदेवीचे मार्गदर्शन तिला दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही. श्वेता बच्चन :महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या चर्चेत नसेल तरच नवल. हॉट आणि ग्लॅमरस अवतारातील तिची झलक सगळ्यांनाच मोहित करणारी आहे. त्यामुळे नव्या आगामी काळात बॉलिवूडमध्ये डेब्यू करेल यात शंका नाही. नेहमीच बिनधास्त राहणाऱ्या नव्याच्याबाबतीत तिची आई श्वेता खूपच जागरूक आहे. नव्याचा ग्लॅमरस अंदाज जपताना ती एका स्टार फॅमिलीशी जुळलेली असल्याची जाणीव श्वेता तिला वेळोवेळी करून देत असते. नव्याचे वडील निखिल नंदा राजकपूर यांचे नातू आहेत.