Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या स्टारसोबत नव्या अभिनेत्रींचे लाँचिंग

By admin | Updated: November 8, 2015 02:43 IST

अजय देवगनचा नवीन चित्रपट शिवायची सध्या जोरादार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबाबत दोन बातम्या येत आहेत. पहिली म्हणजे या चित्रपटापासून अजय अनेक वर्षांनंतर दिग्दर्शनाच्या

अजय देवगनचा नवीन चित्रपट शिवायची सध्या जोरादार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबाबत दोन बातम्या येत आहेत. पहिली म्हणजे या चित्रपटापासून अजय अनेक वर्षांनंतर दिग्दर्शनाच्या मैदानात उतरत आहे. दुसरी बातमी अजयच्या अभिनेत्रीबाबत आहे. नात्याने सायरा बानोची नात असलेली सायशा सैगलला या चित्रपटात लाँच केले जाणार असल्याचे वृत्त आहे. मोठ्या काळानंतर अजयसोबत नवीन अभिनेत्रीला लाँच केले जात आहे. यापूर्वी ‘सिंघम’मध्ये त्यांच्यासोबत काजल अग्रवाल प्रेक्षकांसमोर आली होती. दिग्गज स्टारसोबत नवख्या नायिकांचे येणे अलीकडे वाढले आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्र्शित होणारा शाहरुख खानचा चित्रपट ‘रईस’मध्ये त्याची अभिनेत्री म्हणून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिंदी चित्रपटात पाय ठेवणार आहे, तर आमीर खानच्या आगामी ‘दंगल’ चित्रपटात साक्षी तंवर त्याच्या पत्नीची भूमिका करीत आहे़ तर तिच्याव्यतिरिक्त चित्रपटात नवीन अभिनेत्री फातिमा सनाचे लाँचिंग होणार आहे. आशुतोष गोवारीकरच्या येणाऱ्या ‘मोहनजोदडो’ चित्रपटात हृतिक रोशनसोबत पूजा हेगडेच्या करिअरची सुरुवात होणार आहे. यशराजच्या ‘सुलतान’बाबत मात्र गूढ कायम आहे. ‘सुलतान’ची अभिनेत्री कोण असेल, हे कळायला मार्ग असेल. अनुष्का शर्मापासून ते परिणीती चोपडापर्यंत अनेक नाव चर्चेत आहेत, मात्र यशराजच्या सूत्रांनुसार ‘सुलतान’मध्ये सलमानसोबत नवीन चेहरा असेल, असे संकेत मिळत आहेत.