Join us
Daily Top 2Weekly Top 5

खूपच साधे आहेत ग्लॅमरस लारा दत्ताचा पती आणि लेक, अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:19 IST

लारा दत्ताने कुटुंबीयांसोबत बर्थडे सेलिब्रेशन केलं. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मिस युनिव्हर्सचा किताब मिळवलेली लारा दत्ता ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. अंदाज, पार्टनर, अझहर, नो एन्ट्री, रब ने बना दी जोडी हे तिचे काही गाजलेले सिनेमे. लाराचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. लाराने नुकताच तिचा ४७वा वाढदिवस साजरा केला. 

लारा दत्ताने कुटुंबीयांसोबत बर्थडे सेलिब्रेशन केलं. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बर्थडे साठी लाराने खास लाल रंगाचा ड्रेस घातला होता. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या लाराचं सौंदर्य हे आजही कित्येक तरुण अभिनेत्रींना लाजवेल असंच आहे. लाराने पती आणि लेकीसोबत तिचा ४७वा बर्थडे साजरा केला. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा पती आणि लेकीची झलक पाहायला मिळत आहे. ग्लॅमरस असलेल्या लाराचा पती आणि लेक खूपच साधे आहेत. त्यांचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले असून फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या साधेपणाचे कौतुक केलं आहे. 

दरम्यान, लाराने २०१०मध्ये महेश भूपतीसोबत लग्न केलं. लग्नाआधी ते एक वर्ष एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर दोन वर्षांनी लाराने सायरा या त्यांच्या लेकीला जन्म दिला. लाराच्या कामाबद्दल बोलायचं तर ती वेलकम या सिनेमाची फ्रँचायजी असलेल्या 'वेलकम टू द जंगल' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :लारा दत्तासेलिब्रिटी