Join us

लारा पुन्हा पडद्यावर!

By admin | Updated: May 21, 2015 23:17 IST

‘नो एन्ट्री’, ‘भागम भाग’, ‘हाऊसफुल्ल’ अशा धमाल उडवून देणाऱ्या सिनेमांतील अभिनेत्री लारा दत्ता संसारसुखात नांदत आहे.

‘नो एन्ट्री’, ‘भागम भाग’, ‘हाऊसफुल्ल’ अशा धमाल उडवून देणाऱ्या सिनेमांतील अभिनेत्री लारा दत्ता संसारसुखात नांदत आहे. ‘चलो दिल्ली’ चित्रपटानंतर लारा खऱ्या आयुष्यातील आईची जबाबदारी सांभाळण्यात मश्गुल झाली. आता ती तब्बल चार वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर येतेय. ‘अभी नही तो कभी नही’ या चित्रपटाद्वारे ती पुनरागमन करतेय. वीरेंदर के. अरोरा आणि अर्जुन एन. कपूर ही जोडी या सिनेमातून निर्माता म्हणून पदार्पण करीत आहेत. सिनेमात तिच्या सोबत संजय कपूर, पंकज कपूर, राजीव खंडेलवाल, हिमांश कोहली अशी स्टारकास्ट असल्याने खूप आनंदात असल्याचे ती सांगते.