Join us
Daily Top 2Weekly Top 5

ललित आणि नेहाचा जबरदस्त टीटीएमएम टीझर

By admin | Updated: June 4, 2017 03:35 IST

ललित आणि नेहा यांच्यामध्ये ट्विटर कोल्डवॉर सुरू असताना त्यांच्या सर्वच चाहत्यांनी त्या दोघांना सपोर्ट केला; पण ललित आणि नेहाने त्यांचा आगामी चित्रपट टीटीएमएम

ललित आणि नेहा यांच्यामध्ये ट्विटर कोल्डवॉर सुरू असताना त्यांच्या सर्वच चाहत्यांनी त्या दोघांना सपोर्ट केला; पण ललित आणि नेहाने त्यांचा आगामी चित्रपट टीटीएमएम (तुझं तू माझं मी)ची घोषणा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. टीटीएमएम (तुझं तू माझं मी)चे टीझर पोस्टर्स असोत किंवा रोहित श्याम राऊत आणि द व्हॉइस इंडिया फेम श्रीनिधी घटाटे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गायलेलं लव्ह कम क्लब सॉंग क्षण मोहरे असो, प्रेक्षकांनी सर्व गोष्टींना पसंती दर्शवली. ललित आणि नेहा हे लाईटहाऊस या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आले. पण आता ही जोडी मोठ्या पडद्यावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी मेजवानीच आहे. चित्रपटाचं प्रमुख आकर्षण असलेली ललित आणि नेहाची आॅनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना भावली. नुकतेच रिलीज झालेल्या ‘टीटीएमएम’ चित्रपटाच्या टीझरने सुद्धा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचा टीझर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवतो. या चित्रपटात नेहा आणि ललित यांची नोकझोक तर असणारच आहे पण त्याचसोबत चित्रपट एक फॅमिली ड्रामा असून त्यात रोमान्स, ह्युमर, इमोशन्स या सगळ्या गोष्टींचा आस्वाद प्रेक्षक घेऊ शकणार आहेत. ‘तुझं तू माझं मी’ चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे लग्नापासून दूर पळून आलेले ललित आणि नेहा एकमेकांना भेटतात आणि मग पुढे ते काय करतात हे चित्रपटात पाहणं खूपच रंजक ठरेल. प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी या टीझरला जबरदस्त प्रतिसाद देऊन आपली पसंती दर्शवली आहे. थोड्याच दिवसांत या टीझरला एक लाखाहून अधिक हिट्स मिळाले आहेत. कुलदीप जाधव दिग्दर्शित आणि इरॉस इंटरनॅशनल व वैशाली एंटरटेन्मेंट प्रस्तुत, ‘टीटीएमएम-तुझं तू माझं मी’ चित्रपट येत्या १६ जूनला प्रदर्शित होणार आहे.