Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कुमकुम भाग्य' फेम झीशान खान आणि रेहाना पंडितचे ब्रेकअप? सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 18:06 IST

कारण गेल्या दोन वर्षांपासून झीशान खान त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी अभिनेत्री रेहाना पंडितला डेट करत होता.

'कुमकुम भाग्य' या शोमुळे टीव्ही अभिनेता झीशान खान हे नाव घराघरात पोहोचले. यासोबतच तो 'बिग बॉस ओटीटी' आणि 'लॉक अप' सारख्या शोमुळेही चर्चेत होता. या सगळ्याशिवाय झीशान त्याच्या रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत असतो. कारण गेल्या दोन वर्षांपासून तो त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी अभिनेत्री रेहाना पंडितला डेट करत होता. पण आता या रोमँटिक कपलच्या चाहत्यांसाठी एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. दोन वर्षांच्या मजबूत नात्यानंतर झीशानने सोशल मीडियावर ब्रेकअपची घोषणा केली आहे.

झीशान खान टीव्हीसोबतच सोशल मीडियावरही स्टार आहे. सोशल मीडियावर तो नेहमी काहीतरी पोस्ट करत असतो. अलीकडेच त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर असे काही लिहिले की लोकांचा विश्वास बसत नाही. त्याने इंस्टास्टोरीमध्ये लिहिले, 'चांगल्या वेळेसाठी धन्यवाद. मी तुझ्या भविष्यासाठी प्रार्थना करतो. गुडबाय.' या पोस्टमध्ये त्यांनी रेहानालाही टॅग केले आहे. या पोस्टनंतर रिहानाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रिहाना झीशानपेक्षा वयाने खूप मोठी होती. जेव्हा दोघांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली तेव्हा लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले कारण रेहाना झीशानपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. पण या कपलचं वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष करत एकमेकांसोबत रोमँटिक फोटो शेअर करत राहिले. अचानक झालेल्या या ब्रेकअपच्या घोषणेने लोकांना धक्का बसला आहे.

झीशान आणि रेहानाच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचे तर, दोघांची भेट 'कुमकुम भाग्य' दरम्यान झाली होती. शोमध्ये रेहानाने आलियाची भूमिका केली होती आणि झाशानने आर्यन खन्नाची भूमिका केली होती. शो दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि नंतर दोघे प्रेमात पडले.

टॅग्स :टिव्ही कलाकार