Join us  

नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी क्रांती रेडकर, Video शेअर करत म्हणाली, "मन सुद्ध तुझं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 4:30 PM

अनेक गोष्टी वानखेडेंच्या विरोधात जात असताना पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर खंबीरपणे पाठीशी उभी आहे.

आर्यन खान ड्रग्सप्रकरणी एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयच्या चौकशीच्या भोवऱ्यात ते अडकले आहेत. दरम्यान शाहरुख खानसोबतचे त्यांचे चॅट्सही समोर आलेत. अनेक गोष्टी त्यांच्याविरोधात जात असताना वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) खंबीरपणे पाठीशी उभी आहे. नवऱ्यासाठी तिने एक खास व्हिडिओ शेअर केलाय.

समीर वानखेडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या चांगल्या कामांचा एकत्रित व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये वानखेडे यांनी कस्टम डिपार्टमेंटमध्ये असताना तसंच एनसीबीत असताना त्यांनी ज्या कारवाया केल्या त्याचे फोटो, पेपरमधील फोटो यांचा एकत्रित व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने 'मन सुद्ध तुझं' हे मराठी गाणं लावलं आहे. 'तू तुझा वेळ, ऊर्जा देशासाठी सेवा करण्यात घालवावा अशीच माझी कायम इच्छा आहे' असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. सध्या समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 

सीबीआयला ३ जूनपर्यंत अहवाल द्यावा लागणारहा गुन्हा दाखल झाल्यानंतर वानखेडे यांनी प्रथम दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्या न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने वानखेडे यांना सर्वप्रथम २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. त्यानंतर २२ मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान वानखेडे यांना आता ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. तर, या प्रकरणी ३ जूनपर्यंत सीबीआयने अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

टॅग्स :क्रांती रेडकरसमीर वानखेडेसोशल मीडियाआर्यन खानअमली पदार्थ