Join us

सोनालीची कुल्फी

By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST

एक से बढकर एक चित्रपटांमध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकणारी आपली सोनाली कुलकर्णी सध्या हॅपी मूडमध्ये दिसत आहे. तिच्या बेस्ट फ्रेंड्सना ती नुकतीच भेटली

एक से बढकर एक चित्रपटांमध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकणारी आपली सोनाली कुलकर्णी सध्या हॅपी मूडमध्ये दिसत आहे. तिच्या बेस्ट फ्रेंड्सना ती नुकतीच भेटली असून त्या संदर्भातील फोटो तिने सोशल साइट्सवर अपलोड केले आहेत. एवढेच नाही तर ती म्हणतेय, हिअर अ एक्झॅम्पल आॅफ कुल्फी व्हेन टु कुलकर्णी टेक सेल्फी. आता ती असे का म्हणतेय? तर त्याचे झाले असे, अतुल कुलकर्णी आणि सोनाली दोघांनीही एक सेल्फी घेतला आहे. त्यामुळे ती मजेत सांगते, जेव्हा दोन कुलकर्णी एकत्र येऊन सेल्फी घेतात, त्याला कुल्फी म्हणतात. व्वा! सोनाली खरंच दाद द्यायला पाहिजे तुझ्या सेन्स आॅफ ह्युमरला. सोनाली पुढे म्हणतेय, स्टॉप इनफ आॅफ फॉरवर्डिंग जोक्स, हिअर आॅफ एक्झॅम्पल आॅफ कुल्फी. दोघांच्याही या कुल्फीला त्यांचे चाहते नक्कीच लाइक करतील.