Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा हे काय, कियारा अडवाणीचा हा फोटो Topless नाहीच, समोर आले कॅमेरामागचे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 10:00 IST

फोटोग्राफर डब्बु रत्नानीच्या फोटोशूटसाठी ती टॉपलेस झाल्याचे चर्चा रंगल्या. तिचे अशा प्रकारचे फोटोशूट पाहून तिच्यावर जोरदार टीकाही झाली.

रसिकांचे लक्ष वेधण्यासाठी सेलिब्रेटी मंडळी काय करतील याचा नेम नाही. कधी अतरंगी स्टाइल करत समोर येतील तर कधी कमी कपडे परिधान करत रसिकांचे लक्ष वेधतील अनेकदा असे प्रकार आपण पाहतो. गेल्या काही दिवसांपासून कियारा अडवाणी तिच्या टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आहे.  फोटोग्राफर डब्बु रत्नानीच्या फोटोशूटसाठी ती टॉपलेस झाल्याचे चर्चा रंगल्या. तिचे अशा प्रकारचे फोटोशूट पाहून तिच्यावर जोरदार टीकाही झाली. त्यानंतर तिच्या फोटोवरून फनी मिम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता पुन्हा कियाराचा त्याच फोटोशूटमधला एक फोटो समोर आला आहे. मात्र हा फोटो जरा वेगळा आहे.

 कशारितीने कियाराने हे फोटोशूट केले याचा अंदाज तुम्हाला तिचा हा फोटो पाहिल्यानंतर येईल. फोटोशूट करताना कियारा टॉपलेस झालीच नव्हती.   कॅमेऱ्याची ट्रीक वापरत हा फोटो काढल्याचा सत्य समोर आले आहे. कियाराने स्कीन कलरचे कपडे घातल्याचं कॅमेरा स्क्रीनवर दिसत आहे. त्यामुळे मोठ्या पानामागे उभी राहिलेल्या कियाराचा फोटो अशाप्रकारे क्लिक करण्यात आला की फोटो पाहणाऱ्याला असं वाटेल की ती टॉपलेस आहे.

 

कियारा शेवटची कबीर सिंग व गुड न्यूज चित्रपटात दिसली होती. या दोन्ही चित्रपटातील तिच्या भूमिकेची सगळीकडे खूप प्रशंसा झाली आहे. इतकेच नाही तर या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच 'गिल्टी' या वेबफिल्मचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यातदेखील कियाराचा अंदाज प्रेक्षकांना भावतो आहे. यात कियाराचा आतापर्यंत न पाहिलेला असा बोल्ड अवतार पहायला मिळतो आहे.

टॅग्स :कियारा अडवाणीडब्बू रतनानी