Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे सोनम कपूरचा होणारा पती? जाणून घ्या त्याच्या या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 15:27 IST

आता त्यांचं लग्न पुढील महिन्यात मुंबईत होणार आहे. सोनमच्या लग्नाच्या तारखेपासून ते पाहुण्यांच्या लिस्टपर्यंत सगळ्याच गोष्टी ठरल्या आहेत. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचं लग्न गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. सोनम कपूर ही दिल्लीचा उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न करणार असून आधी त्यांचं लग्न मार्चमध्ये होणार अशी चर्चा होती. पण आता त्यांचं लग्न पुढील महिन्यात मुंबईत होणार आहे. सोनमच्या लग्नाच्या तारखेपासून ते पाहुण्यांच्या लिस्टपर्यंत सगळ्याच गोष्टी ठरल्या आहेत. 

सोनमचं लग्न 6 आणि 7 मे या तारखेला मुंबईतील एका हॉटेलमध्ये होणार आहे. त्यानंतर दिल्लीत एक ग्रॅंड रिसेप्शनही होणार आहे. अशात सोनमचं ज्याच्यासोबत लग्न होत आहे, तो आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोनमचा होणारा नवरा हा एक उद्योगपती आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण त्याच्याबद्दल फारसं कुणाला माहिती नाही. त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कोण आहे सोनमचा होणारा नवरा?

सोनम कपूरचा बॉयफ्रेन्ड आनंद आहुजा हा एक उद्योगपती आहे. आनंदचा  Bhane नावाचा कपड्यांचा एक मोठा ब्रॅंड आहे. त्यासोबतच आनंद आहुजा  शाही एक्स्पोर्टचा मॅनेजिंग डिरेक्टरही आहे. आनंद आहुजा हा देशातील पहिल्या शू स्टोरचा फाऊंडर आहे. 

असा सुरु केला बिझनेस

आनंद आहुजाने दिल्लीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेला.  इतकेच नाहीतर आनंद आहुजाने अमेरिकेत अॅमोझॉन कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर म्हणूनही कामही केलं. त्यानंतर त्याने स्वत:चा फॅमिली बिझनेस सांभाळला.   

शू स्टोरचा फाऊंडर

आनंद वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस करतो. आनंद फॅशन आणि लाईफस्टाईल संबंधी वेगवेगळे बिझनेस करतो. देशातील पहिल्या शू स्टोरचा फाऊंडर आनंद आहे. या स्टोरचं नाव व्हेज- नॉन व्हेज आहे. या शोरुमध्ये वेगवेगळ्या ब्रॅंडचे शू प्रॉडक्ट ठेवले जातात.

आनंदच्या आवडी-निवडी

आनंद आहुजा याला बास्केटबॉल खेळणं पसंत आहे. इतकेच नाहीतर तो लॉस एंजेलिस लेकर्स टीमचा खेळाडूही राहिला आहे. त्यासोबतच त्याला फिरण्याची आवड आहे. आनंदची आवडती अभिनेत्री सोनम कपूरच आहे. त्यासोबत त्याला दीपिका सुद्धा आवडते. 

टॅग्स :सोनम कपूरबॉलिवूड