गायक किशोर कुमार जिवंत नसले तरी आजही चाहत्यांच्या मनात त्यांची क्रेझ कायम आहे. आजही त्यांची गाणी, त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत. किशोर कुमार यांनी आपल्या आवाजाने कित्येक पिढ्यांना वेड लावले. किशोर यांनी त्यांच्या निधनाच्या अवघ्या २४ तास आधी आपले शेवटचे गाणे रेकॉर्ड केले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. ३९ वर्षांनंतरही हे गाणे युट्यूबवर तुफान हिट ठरत आहे.
किशोर कुमार यांचे १३ ऑक्टोबर १९८७ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या दुर्दैवी दिवसाच्या बरोबर एक दिवस आधी म्हणजेच १२ ऑक्टोबर १९८७ रोजी त्यांनी आयुष्यातील शेवटचे गाणे रेकॉर्ड केले होते. हे गाणे 'वक्त की आवाज' या चित्रपटातील असून त्याचे बोल आहेत "गुरु गुरु आ जाओ".हे गाणे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
किशोर कुमार यांनी हे गाणे आशा भोसले यांच्यासोबत गायले होते. प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांनी या गाण्याला संगीत दिले होते. या गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चित्रपटसृष्टीने आपला हा अनमोल हिरा कायमचा गमावला.
युट्यूबवर २५ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज!३९ वर्षांपूर्वीचे हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. 'शेमारू'च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर हे गाणे उपलब्ध असून, आतापर्यंत याला २५ दशलक्ष (२.५ कोटी) हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. किशोर कुमार यांच्या आवाजातील तीच जादू आजही चाहत्यांना या गाण्याकडे खेचून आणते. आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत किशोर कुमार यांनी हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांमध्ये अंदाजे १६,००० गाण्यांना आपला आवाज दिला होता.
Web Summary : Kishore Kumar's voice still captivates. His last song, 'Guru Guru Ajao,' recorded a day before his death in 1987, remains a YouTube hit with over 25 million views. Sung with Asha Bhosle and composed by Bappi Lahiri, it stars Mithun and Sridevi.
Web Summary : किशोर कुमार की आवाज़ आज भी दिलों पर राज करती है। उनका आखिरी गाना, 'गुरु गुरु आजाओ', जो 1987 में उनकी मृत्यु से एक दिन पहले रिकॉर्ड किया गया था, आज भी यूट्यूब पर 2.5 करोड़ से ज़्यादा व्यूज़ के साथ हिट है। आशा भोसले के साथ गाया और बप्पी लाहिड़ी द्वारा संगीतबद्ध, इसमें मिथुन और श्रीदेवी हैं।