Join us

किंग खानने केले श्रियाचे कौतुक

By admin | Updated: April 20, 2016 02:14 IST

किंग खानचा फॅन या चित्रपटाने एका दिवसात बॉक्सआॅफिसवर करोडो रुपये कमावले आहेत. तसेच, शाहरुखच्या ‘फॅन’ या चित्रपटामध्ये श्रिया पिळगावकर असल्याची चर्चादेखील रंगली होती

किंग खानचा फॅन या चित्रपटाने एका दिवसात बॉक्सआॅफिसवर करोडो रुपये कमावले आहेत. तसेच, शाहरुखच्या ‘फॅन’ या चित्रपटामध्ये श्रिया पिळगावकर असल्याची चर्चादेखील रंगली होती. पण, खुद्द बॉलिवूडच्या या तगड्या कलाकाराने एका कार्यक्रमादरम्यान आपल्या मराठमोळ्या श्रिया पिळगावकरचे भरूभरून कौतुक केले आहे. शाहरूख म्हणाला, ‘‘श्रिया ही खूप कमालची अ‍ॅक्टर आहे. तिच्यासोबत काम करताना खूप मजा आली. तसेच या चित्रपटाचे शूटिंग एक वर्षापूर्वी संपल्यामुळे अजून तिची आणि माझी भेट झालेली नाही.’’ त्यामुळे श्रियाला भेटायची इच्छादेखील शाहरुखने या कार्यक्रमात व्यक्त केली. शाहरुखचे हे कौतुकास्पद बोल ऐकता, श्रियाने त्याबाबत सोशल मीडियावर भावना व्यक्त केली, की एवढ्या मोठ्या कलाकारांकडून कौतुकाची थाप मिळाली असता, जगातील सर्वांत मोठी स्माइल माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. तसेच, या वेळी तिने शाहरुखचे आभारदेखील मानले.