Join us

अभिनेत्री चक्क लिफ्टमध्ये पतीसोबत झाली इंटिमेट, सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 15:05 IST

या अभिनेत्रीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देकिम आणि तिचा पती केन वेस्टचा हा एका लिफ्टमधील व्हिडिओ असून ते दोघे एका मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेले होते. त्यावेळेचा हा व्हिडिओ असल्याचे म्हटले जात आहे. लिफ्टमध्ये असताना किम आणि तिच्या पतीने एकमेकांना किस केले.

बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सिनेइंडस्ट्री प्रत्येक सेलिब्रेटीची स्टार व्हॅल्यू ठरते ती त्यांच्या फॅन फॉलोइंगने. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सेलिब्रेटी काहीही करायला तयार होतात. मग ते हटके लूक करतात तर कधी फोटोशूट. असं बऱ्याचदा पहायला मिळतं जेव्हा फोटोशूटमुळे कलाकार सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत असतात. पण हॉलिवूडमधील एक अभिनेत्री सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सार्वजनिक ठिकाणी ही अभिनेत्री तिच्या पतीसोबत इंटिमेट होताना दिसली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

किम कार्दिशियन नेहमीच तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. तिच्या फोटोंमुळे ती नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. पण आता ती सार्वजनिक ठिकाणी तिच्या पतीसोबत इंटिमेट होताना दिसली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. किम आणि तिचा पती केन वेस्टचा हा एका लिफ्टमधील व्हिडिओ असून ते दोघे एका मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेले होते. त्यावेळेचा हा व्हिडिओ असल्याचे म्हटले जात आहे. लिफ्टमध्ये असताना किम आणि तिच्या पतीने एकमेकांना किस केले. ही लिफ्ट काचेची असल्याने काही लोकांनी हा व्हिडिओ शूट केला. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लिफ्टमधून बाहेर पडताना केन काहीसा गोंधळलेला दिसला तर किम बिनधास्त अंदाजात तिथून निघून गेली. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किमने देखील तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात किमने टाईट ड्रेस घातला असून त्यात ती हॉट अँड ग्लॅमरस दिसत आहे.

टॅग्स :किम कार्देशियन