Join us  

शिव ठाकरेला डेट करण्याच्या चर्चांवर बॉलिवूड अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही एकमेकांना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 11:00 AM

Khatron Ke Khiladi 13 : शिव ठाकरेबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांवर डेजी शाहची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

मराठमोळा शिव ठाकरे 'खतरो के खिलाडी १३' शोमधून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री डेजी शाहही सहभागी झाली आहे. काही दिवसांपासून शिव आणि डेजी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शिव आणि डेजी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एकमेकांबरोबरचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. याबरोबरच अनेक सार्वजनिक ठिकाणीही त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

शिव ठाकरेबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांवर आता डेजी शाहने मौन सोडलं आहे. 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत डेजीने यावर भाष्य केलं. ती म्हणाली, "शिव ठाकरेबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांमुळे आमच्या मैत्रीवर काही परिणाम झालेला नाही. आम्ही या गोष्टी आमच्या पद्धतीने सांभाळतो. आम्ही एकमेकांना डेट करत आहोत, हे जोपर्यंत आम्ही सांगत नाही. तोपर्यंत मीडिया किंवा चाहत्यांनी आमच्या रिलेशनशिपबाबत कोणताही निर्णय घेऊ नये. सध्या तरी आम्ही फक्त मित्र आहोत." 

“दारू पिणे ही मोठी चूक”, रजनीकांत यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले, “नशेत रात्री दोन वाजता...”

"अफवांमुळे आमचं रिलेशनशिप किंवा मैत्रीत काहीही फरक पडत नाही. आम्ही पहिल्यापेक्षा जास्त फ्रेंडली झालो आहोत. आमचं वैयक्तिक आयुष्य आम्ही आमच्यापर्यंतच सिमीत ठेवू इच्छितो. सगळ्यांबरोबर या गोष्टी शेअर करणं मला आवडत नाही. जेवढे तुम्ही जास्त शेअर करता तेवढ्या जास्त चर्चा रंगतात, असं मला वाटतं," असंही ती पुढे म्हणाली. 

“वडील गेल्यानंतर त्या १३ दिवसांत...”, रवींद्र महाजनींबद्दलच्या चाहत्याच्या प्रश्नाला गश्मीरचं सडेतोड उत्तर

दरम्यान, डेजीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटात ती झळकली होती. याबरोबरच तिने 'हेट स्टोरी ३', 'रेस ३' या चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर शिव ठाकरे 'बिग बॉस हिंदी'च्या १६व्या पर्वात सहभागी झाला होता. 

टॅग्स :शीव ठाकरेखतरों के खिलाडीडेझी शहा