Join us
Daily Top 2Weekly Top 5

केतकी बनली संगीतकार

By admin | Updated: June 30, 2016 01:05 IST

सध्या अभिनय आणि गायन स्वत:च करण्याची क्रेझ बॉलीवूड व मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसत आहे;

सध्या अभिनय आणि गायन स्वत:च करण्याची क्रेझ बॉलीवूड व मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसत आहे; पण तरुणांना वेड लावणारी सुंदर अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने याही पुढे एक पाऊल टाकत आता गायिका, अभिनेत्रीसोबतच संगीतकाराचा शिक्कादेखील आपल्या नावावर करून घेतला आहे. केतकीचा लवकरच एक नवीन व्हिडीओ म्युझिक प्रदर्शित होणार आहे. या व्हिडीओमध्ये सुरेश वाडकर यांच्या सुरेल आवाजाला केतकी माटेगावकर संगीतबद्ध करणार आहे. हा व्हिडीओ अभंगांचा असेल. सूत्रांकडून असेही समजते की, हे अभंग केतकीने स्वत: लिहिले असून हे अभंग तिची दुसऱ्या गायकाकडून गाऊन घेण्याची इच्छा होती. असो. पण, तिची ही इच्छा सुरेश वाडकर यांच्या आवाजातून पूर्ण होते, म्हणजे तिच्या या नवीन व्हिडीओला चार चाँद लागल्यासारखेच आहे.