Join us

केजरीवाल ते सलमान सारेच ‘वेल्फीमय’

By admin | Updated: July 12, 2015 04:11 IST

अलीकडच्या काळात सेल्फी हा शब्द खूप कानावर पडू लागला आहे. पण आता वेल्फी हा प्रकार रुढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. बॉलिवूड कलावंत, क्रीडापटू यांच्यासह

अलीकडच्या काळात सेल्फी हा शब्द खूप कानावर पडू लागला आहे. पण आता वेल्फी हा प्रकार रुढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. बॉलिवूड कलावंत, क्रीडापटू यांच्यासह राजकारण्यांनाही वेल्फीने वेड लावले आहे. नवनवीन आणि अद्यावत मोबाईल फोनच्या सहाय्याने ही मंडळी आपले व्हिडिओ सोशल मिडियावर आॅनलाईन पोस्ट करीत आहेत. २०१४ हे वर्ष सेल्फीचे होते तर आता २०१५ हे वर्ष वेल्फीचे आहे, असे म्हटले जात आहे.डबमॅश नावाचे एक अप्लिकेशन यासाठी वापरले जाते. यात आधीच रेकॉर्ड केलेल्या गाणी किंवा संवादासोबत स्वत:चा व्हिडिओ जोडला जातो. सलमान आणि सोनाक्षी यांनी १९७१च्या एका हिंदी चित्रपटाच्या संवादाला जोडलेला स्वत:चा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकला. ज्याला ७१ हजारपेक्षा जास्त जणांनी लाईक केले आहे. भारतात वेल्फीचे आगमन एप्रिलमध्ये झाले. भारतातील वेल्फीचे सहसंस्थापक राममोहन सुंदरम म्हणाले, हे व्हिडिओ मनोरंजनाचे चांगलेच लोकप्रिय माध्यम ठरत आहे. ‘फ्रॅन्कली मी’ चे सहसंस्थापक निकुंज जैन म्हणाले, आम आदमी पार्टीने या तंत्राचा वापर दिल्लीच्या निवडणुकांच्या वेळी कौशल्याने केला होता. अरविंद केजरीवाल यांनी लोकांकडून प्रश्न मागवले होते. त्यानंतर त्या प्रश्नांना वेल्फीने उत्तर दिले होते. भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगसुद्धा वेल्फीच्या प्रेमात आहे.