चित्रपटातील भूमिकेची गरज म्हणून कलाकारांनी आपले वजन कमी केल्याची उदाहरणे खूप आहेत. पण खास चित्रपटासाठी दिग्दर्शकाने वजन कमी केल्याचे उदाहरण विरळाच. असेच काहीसे आगामी ‘अगं बाई अरेच्चा २’ चित्रपटाच्या निमित्ताने बघायला मिळाले आहे. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटाची गरज म्हणून सोनाली कुलकर्णीने वजन वाढवले होते. आता ‘अगं बाई अरेच्चा २’ चित्रपटातील शुभांगी साकारताना सोनालीने पुन्हा वजन कमी केले आहे. या सुपरस्टारच्या बरोबर उभे राहिल्यावर शोभावे म्हणून खास दिग्दर्शक केदार शिंदेनेही ‘वेट लॉस’ करण्याचे मनावर घेतले आहे. यासाठी खास डाएटिशियनचे मार्गदर्शन घेत महिनाभरात त्याने १० किलो वजन कमी केले आहे.
सोनालीमुळे केदारचे वजन कमी
By admin | Updated: May 9, 2015 01:00 IST