Join us
Daily Top 2Weekly Top 5

केदारची कोरिओग्राफी

By admin | Updated: May 10, 2015 23:12 IST

हरहुन्नरी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या २२ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘अगं बाई अरेच्चा २’ चित्रपटात ‘कोरिओग्राफी’चे कौशल्यही दाखविले आहे.

हरहुन्नरी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या २२ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘अगं बाई अरेच्चा २’ चित्रपटात ‘कोरिओग्राफी’चे कौशल्यही दाखविले आहे. ‘दिल मेरा’ आणि सिनेमातील अजून एका गाण्याची कोरिओग्राफी त्यांनी केली आहे. ते स्वत: मोहिनअट्टम् आणि कथकली हे शास्त्रीय नृत्य शिकले आहेत. यापूर्वीच्या चित्रपटातूनही त्यांनी कोरिओग्राफी केली आहे. मात्र ‘अगं बाई अरेच्चा २’ हा अजून वेगळा प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही गाण्यांमध्ये नृत्यापेक्षा चित्रीकरणाच्या कल्पकतेचा जास्त विचार केला आहे. ही गाणी मोंटाज पद्धतीने वापरली आहेत. त्यामुळे मीच त्याची कोरिओग्राफी केली आहे. अर्थात या गाण्यांसाठी पुरस्कार वगैरे मिळण्याची अपेक्षा नाही. शास्त्रीय नृत्य शिकलेले असल्याने कोरिओग्राफी करताना खूप फायदा होतो, असेही त्यांनी सांगितले.