Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 11:25 IST

मेघा धाडे बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती आहे.

दिग्दर्शक आणि कलर्स चॅनल प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे (Kedar Shinde)  सध्या चर्चेत आहेत. बिग बॉसचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) तसंच रितेश देशमुखला होस्ट म्हणून आणण्यापर्यंत केदार शिंदे या सर्व प्रक्रियेत सहभागी आहेत. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी बिग बॉसबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी बिग बॉस मराठीचे पहिले चार सीझन 'सो कॉल्ड ' लोकांनीच बघितले असं वक्तव केलं. यावर बिग बॉस मराठीची पहिली विजेती मेघा धाडेने प्रतिक्रिया दिली आहे.

केदार शिंदेंनी नुकतीच अमो परचुरेंच्या 'कॅचअप' चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांन बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची इतर सीझनशी तुलना केली. ते म्हणाले, "बिग बॉस मराठीचे पहिले चार पर्व हे सो कॉल्ड लोकांना आवडले असतील. पण ते गाजले नव्हते." त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने कमेंट करत लिहिले, 'सो कॉल्ड लोक? हाहाहा'.  मेघाने मोजक्या शब्दात तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

बिग बॉस मराठी सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. मग ते केदार शिंदे, रितेश देशमुख असो किंवा आर्या-निक्कीमध्ये झालेली झटापट,आर्याची हकालपट्टी, संग्रामची वाईल्ड कार्ड एन्ट्री या सर्वच कारणांमुळे सतत सोशल मीडियावर बिग बॉस गाजत आहे हे नक्की.

टॅग्स :केदार शिंदेमेघा धाडेबिग बॉस मराठीकलर्स मराठी